कोपरगाव (प्रतिनिधी ):- काल कोपरगाव जवळ पर राज्यातून गुटखा येणार अशी गुप्तहेर कडून माहिती मिळाली होती.
दिनांक २ रोजी कोपरगाव चे पोलीस निरीक्षक देसले यांना पर राज्यातून गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. येवल्याकडून एक आयशर कंटेनर क्रमांक एम.पी.09 जीजी 2900 या क्रमांकाच्या कंटेनर मधून मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याची माहिती मिळाली होती. गुप्तहेर कडून मिळाल्या माहितीनुसार कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देसले व मुख्याधिकाऱ्यासह सर्वजण येवला रोडवर सापळा लावून. कंटेनर ची वाट पाहत बसले होते.
सदर कंटेनर हा येताच कंटेनर वाल्याला थांबवण्यास सांगितले. कंटेनर चालकाला कंटेनर मध्ये काय आहे अशी विचारणा केल्यानंतर त्याने कंटेनर मध्ये बेसन पीठ व मिनी बारी असल्याचे सांगितले व त्याचबरोबर त्याने बिल्टी ही दाखवली. त्यावर इंदोरच्या लक्ष्मीनिवास एक्सपोर्ट या कंपनीचे इंग्रजी मध्ये नाव लिहिलेले होते. परंतु बिल्टीवर गाडी क्रमांक हा दुसराच होता आणि त्यावर 50 किलो वजनाच्या 60 बॅग असं मजकूर लिहिलेला होता. आयशर क्रमांक हा वेगळा दिसल्याने पोलिसांना वेगळा संशय आला त्यानंतर आयशर कंटेनर ची तपासणी केली असता कंटेनरच्या सुरुवातीला मिनी बाराच्या गोण्या व बेसनाच्या गोण्या आढळून आल्या मात्र त्याला खेटून आतील भागात भारताच्या काही पोते आढळले. त्या बारदान्यांचा तंबाखू मिश्रित वास येत असल्याने पोलिसांनी त्या कंटेनर ची बारकाईने तपासणी केली. तपासणीमध्ये विमल पान मसाला कंपनीच्या तसेच राज्यश्री रजनीगंधा अशा प्रतिबंध गुटखा पोते आढळून आले त्यानंतर कंटेनर चालकास याबाबत विचारणा केली असता त्याने लक्ष्मी निवास एक्सपोर्ट इंदोर येथून हा गाडी भाडे जगदीश ट्रेडिंग कंपनी, हडपसर पुणे येथे घेऊन चाललो आहे असे त्याने सांगितले.
सदर कंटेनर मध्ये जर्दा तंबाखू मिश्रित गुटखा याचे पोते आढळले. या कंटेनर मध्ये जवळपास एक कोटी 34 हजार 40 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाई जप्त केला आहे. याप्रकरणी कंटेनर चालक जमील अहमद इद्रीस अहमद याच्या विरोधात भा द वि कलम
188,272,273,328 अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 26(2 ) आय 26(2)
व्ही 59 प्रमाणे कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असूनही मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक या शेजारील राज्यांमधून संपूर्ण महाराष्ट्र बरोबर नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव राहाता राहुरी संगमनेर शिर्डी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा व्यवसाय करणारे मोठी रॅकेट आहे. पोलीस प्रशासन व अन्न भेसळ प्रशासनाकडून अनेकदा या व्यापाऱ्यांवर कारवाई करूनही यांच्यावर कुठलाही दबाव पडत नाही. त्यामुळे हे सर्व गुटखा किंग साठे लोटे करून हा व्यापार चालवत आहे. यामुळे तरुण पिढी ही गुटखा व्यसन धीन होत आहे. तेव्हा या गुटका किंग वर लवकरात लवकर कारवाई करावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे