20 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

नगररचना सहायक संचालक कार्यालय अखेर श्रीरामपुरातच आमदार लहू कानडे याच्या पाठपुराव्याला यश

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा)  :- श्रीरामपूर येथील लवाद नगररचना योजना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नगररचना शाखा असे नामकरण करण्यात आले असून त्यासाठी पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने मंगळवारी त्यासंबंधीचे आदेश पारित केले. या कार्यालयास उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुके जोडन्यात आली आहेत. आमदार लहू कानडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 

सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयास श्रीरामपूरसह संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी, नेवासा व अकोले हे तालुके अंतराने जवळ असल्याने जोडण्यात आले आहेत. या सर्व तालुक्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच महसूल विभागाकडील नगररचना विषयक कामकाज श्रीरामपुरातील सहाय्यक संचालक कार्यालयाकडून करता येणार आहेत. त्यास नगर विकास विभागाने काल मान्यता दिली.

श्रीरामपूर येथे लवाद कार्यालयाऐवजी सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयाची नव्याने निर्मिती करवी, यासाठी आ. कानडे यांनी प्रयत्न करून पाठपुरावा केला होता. मंगळवारच्या आदेशाने कार्यालयाचे कार्यक्षेत्र निश्चित करुन येथे नवीन पदांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्याच्या भागातील नागरिकांची घरांच्या बांधकाम परवानगी व बिगर शेतीच्या कामांसाठी नगर येथे जाण्याची आता आवश्यकता राहणार नाही. नगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून येथे १४ तालुक्यांचा समावेश आहे. नगररचना विभागाचे जिल्हास्तरीय कार्यालय केवळ नगर येथे मुख्यालयी कार्यरत होते. त्यामुळे उत्तरेतील सात तालुक्यांच्या नागरिकांची मोठी गैरसोय होती. ग्रामीण भागातील नागरिकांना बांधकाम विषयक कामासाठी नगर येथे जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत होती.

आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर येथील नगररचना योजनेकरिता कार्यरत असणाऱ्या लवाद कार्यालयाचे रूपांतर शाखा कार्यालयात करून उत्तरेकडील तालुक्यातील नागरिकांची बांधकाम परवानगी व बिगर शेतीच्या कामांची गैरसोय दूर व्हावी यासाठी सरकारच्या नगर विकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. कानडे यांनी अधीवेशनामध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मध्यंतरी हे कार्यालय इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. या शासन निर्णयामुळे श्रीरामपूरमध्ये आणखी एका सरकारी कार्यालयाची नव्याने भर पडली असून नागरिकांनी आ. कानडे यांना धन्यवाद दिले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!