लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पदमभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी येथील अनुक्रमे एम. फ़ार्म अभ्यासक्रमातील एक आणि बी . फार्मसी अभ्यासक्रमातील पाच अशा एकूण सहि विद्यार्थ्याची टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टिसीएस )या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
एम. फार्मसी मधून कु. आरती घोरपडे हिची पुणे येथे वार्षिक वेतन पाच लाख रुपये वेतन श्रेणी मध्ये निवड झाली तर बी. फार्मसी मधून अनुक्रमे अनिकेत गाडेकर, रोहित नागरे, मोईन शेख, स्वप्नील पिंपळे आणि दिशा खंडागळे यांची वार्षिक वेतन तीन लाख रुपये वेतन श्रेणी मध्ये निवड झाली. औषधनिर्माणशास्रमध्ये अतिशय महत्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स या विभागामध्ये प्रवरा फार्मसीच्या सहा विद्यार्थ्यांची निवड होणे म्हणजे महाविद्यलयाच्या दृष्टीने विशेष बाब आहे. महाविद्यालयाने मुलाखती पूर्वी आयोजित केलेल्या सॉफ्ट स्किल ट्रैनिंग कार्यक्रमाचा फायदा या विद्यार्थ्यांना या नोकरीसाठी झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. अंतिम परीक्षेपूर्वी नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने त्यांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. प्रवरा हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायमच अग्रभागी असते.महाविद्यालयात नेहमी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षणआयोजित केले जाते.महाविद्यालयात स्वतंत्र ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत असून त्याचा विद्यार्थ्यांना नेहमी फायदा होत असतो.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव श्री. भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख श्री मनोज परजणे यांनी तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. पाटील,प्राचार्य डॉ संजय भवर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.