spot_img
spot_img

लोणीच्या प्रतीक सिनारे याने यूपीएससी मध्ये मिळवली देशपातळीवर ६९ वि रँक; केंद्रीय सशस्त्र दलात बनला असिस्टंट कमांडन्टप्रवरा शैक्षणिक संकुलाचा माजी विद्यार्थी

लोणी दि.३(जनता आवाज वृत्तसेवा):-जिद्द,चिकाटी आणि सहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील प्रतीक दत्तात्रय सिनारे याने केंद्रीय स्पर्धा परीक्षा(यूपीएससी) मध्ये देशपातळीवर ६९ वि रँक मिळवत केंद्रीय सशस्त्र दलात असिस्टंट कमांडन्ट पद मिळवले.
       

 प्रतीक याने प्राथमिक,माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण लोणी येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा विद्यिर्थी असून मेकॅनिकल अभियांत्रिकीचे  शिक्षण त्याने सिंहगड महाविद्यालय पुणे येथे घेऊन नोकरी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा देऊन केंद्रीय सेवेत दाखल होण्याचे ध्येय ठेवले. गेली सहा वर्षे त्याने आपल्या ध्येय पूर्तीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले.त्याला पोलीस दलातच सेवा करायची असल्याने स्पर्धा परीक्षेतून त्याला इतर विभागात यश मिळूनही त्याने ते स्वीकारले नाही.अखेर २०२३च्या केंद्रीय स्पर्धा परीक्षेत त्याने देश पातळीवर ६९ वि रँक मिळवत केंद्रीय सशस्त्र दलात( CAPF) असिस्टंट कमांडन्ट पद मिळवून आपली स्वप्नपूर्ती केली. प्रतिकचे वडील प्रवरा शिक्षण संस्थेत कनिष्ठ महाविद्यालयात तर आई माध्यमिक विद्यालय शिक्षक म्हणून सेवेत आहेत. प्रतिकच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले.

 यशाची खात्री होती: सुशांत म्हस्के
प्रतिकचा बालपणापासूनच मित्र सुशांत म्हस्के याने आपल्या मित्राच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की,प्रतीक लहानपणापासून हुशार आणि ध्येयवेडा होता.त्याने एखादी गोष्ट करायची ठरवली तर तो ती केल्याशिवाय रहात नव्हता.अभ्यास करताना त्याने एकदा वाचन केले की त्याचे स्मरणात रहायचे. आम्ही शाळा,महाविद्यालयात सोबत शिकलो.त्याला पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे खूप आकर्षण होते.मला पोलीस दलात मोठा अधिकारी व्हायचे असे तो कायम म्हणायचा.इंजिनियर झाला पण त्याने नोकरी मिळूनही ती स्वीकारली नाही.तो केंद्रीय परीक्षांचा अभ्यास करीत राहिला.शेवटी त्याने यश मिळवलेच. पोलीस दलातील अधिकारी शोभेल असे त्याचे व्यक्तिमत्व आहे.आम्हाला सर्व मित्रांना त्याचा खूप अभिमान वाटतो असे सुशांतने सांगितले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!