24.6 C
New York
Monday, August 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

माळवाडगाव जि. प. प्राथमिक शाळा तालुकास्तरीय खो खो, कबड्डी स्पर्धेत प्रथम विजेता……

माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर येथे बोरावके कॉलेज येथे नुकत्याच तालुका स्तरीय खो खो, कबड्डी स्पर्धा पार पडल्या, खो खो स्पर्धेत मुलीचा लहान गट व मोठा गट, तसेच मुलाचा मोठा गट हे तिन्ही संघ फायनल फेरीत विजयी झाले, असुन या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धे साठी निवड झाली.

तसेच कबड्डी स्पर्धा मध्ये मुलीचा मोठा गट फायनल मध्ये विजयी झाला व मुलाचा मोठा गटाने द्वितीय क्रमांक पटकविला, तसेच वैयक्तिक उंच उडी मोठा गट मध्ये रोहित शरद आसने प्रथम क्रमांक मिळवत विजय संपादन केला , लांब उडी स्पर्धेत लहान गट समर्थ शिंदे प्रथम क्रमांक मिळवत विजयी,थाळीफेक स्पर्धेत रेहान शेख, त्रिशा खैरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला वरील सर्व विद्यार्थीनी विजय संपादन केल्या बद्द्ल तसेच जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र विद्यार्थी चे कौतुक होत आहे.

तालुकास्तरीय विविध स्पर्धेत माळवाडगाव प्राथमिक शाळाने मोठे यश संपादन केले या खेळाडूंना मुख्याध्यापक मुंतोडे सर चव्हाण सर घोंगडे सर, शेळके सर,संगीता साळवे मॅडम, बोंबडे मॅडम, मारिया साळवे मॅडम, तोडमल मॅडम,मते मॅडम, पाचपिंड सर आदी शिक्षकवृद याच मोलाचे मार्गदर्शन लाभले . या विजयी संघाचे, खेळाडू चे शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, समिती सदस्य , पालकवर्ग ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!