spot_img
spot_img

देवळाली शहरातून अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या आरोपींची पायी  धिंड  

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी आज २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहरातून पायी फिरवले आहे. महाविद्यालय व विद्यालय परिसरात अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील ५ आरोपींना पायी फिरवल्याने गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच धाक बसला आहे.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या १६ पैकी १० अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींना गजाआड करून मित्रांना व नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.

आज सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस पथकाने अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील ५ आरोपिंना देवळाली प्रवरा शहरातून व राहुरी फॅक्टरीत पायी फिरवले आहे. महाविद्यालय व शाळा परिसरात फिरवले आहे.यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक विष्णू आहेर, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री.फुलारी, हनुमंत आव्हाड, विकास साळवे, श्री.खेमनर, अमित राठोड, सम्राट गायकवाड, श्री.लिपणे आदिंसह होमगार्ड जवान उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!