अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा ): – माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक पॉलिटेक्निक व फार्मसी महाविद्यालयाचे वतीने मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे व कारखाना संचालिका तथा शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली अशोकनगर येथे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सदर मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी पारंपारिक पेहराव व भगवे फेटे परिधान केले होते. रोहित वडते याने शिवाजी महाराज तर प्राजक्ता भांड हिने राजमाता जिजाऊ चे पोशाख परिधान करून मिरवणूक लक्षवेधी केली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर, कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष देवकर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



