टाकळीभान ( प्रतिनिधी):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१० वीचा निकाल – ९९.३७ टक्के लागला आहे.
विद्यालयातून कु. दिशा नानासाहेब गिते या विद्यार्थिनीने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.कु.भक्ती गणेश लेलकर या विद्यार्थिनीने ९२. ८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तर कु. दिव्या जालिंदर कोकणे या विद्यार्थिनीने ,९२.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.



