श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा):- व्होकल सिंगिंग राज्यस्तरीय स्पर्धेत ऋषिकेश अशोक साळवे याचा पहिला क्रमांक.कस्तुरी शिक्षण संस्था आयोजित प्रतिमा ललित कला केंद्र शिक्रापूर ( ता. शिरूर ) येथे नुकतीच पार पडली.
यामध्ये स्टेट लेवल कंपेटेशन वोकेल म्युसिक ( सिंगिंग ) मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील ऋषिकेश अशोक साळवे याचा वोकेल सिंगिंग राज्यस्तरीय (महाराष्ट्र) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीत यश संपादन करीत गायन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे .
या क्षेत्रात येण्यापूर्वी फक्त गाणे म्हणायचो काहीही माहिती नव्हते तरीही आवड मात्र होती मग ठरविले कि गायन क्षेत्रात पाऊल ठेवायचं पण घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून अगोदर जॉब पाहिला आई-वडिलांना विचारले की मला गाणे गायाला शिकायचे आहे. पहिल्यांदा नकार दिला पण मीही आश्वासन दिले कि मी या क्षेत्रात काहीतरी नक्की करेल मला एक संधी द्या मग शिरूर मध्ये श्रीहरी विठ्ठल मेंदरकर सर यांनी मला मार्गदर्शन तर केलेच पण आज जे काही आहे हे सर्व त्यांचीच देणं आहे .आणि गुरुवर्य सौरभ मास्तोळी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाची शिखर सर करण्यामागे आई-वडिलांचा आणि माझ्या गुरुजनांचा मोठा वाटा आहे. असे विजेते स्पर्धक ऋषिकेश अशोक साळवे व्यक्त होताना पत्रकारांशी बोलले.



