ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या १,८९८ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली यामध्ये १,८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३९ शाळा पैकी शंभर टक्के निकाल असलेल्या शाळा – १३ तर २८ शाळाचा निकाल हा ९६ ते ९० टक्के लागला असून उच्च श्रेणी मध्ये ६३६ प्रथम श्रेणी ६८४ तर तृतीय श्रेणीत १०० विद्यार्थी यशस्वी ठरले. शंभर टक्के शाळा मध्ये प्रवरा कन्या विद्या मंदीर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश स्कुल, पदमश्री विखे पाटील सैनिकी स्कुल, लोणी, ज्ञानमारुती, रामपुरवाडी प्रवरा माध्यमिक विद्यालय, गोगलगांव, झरेकाठी, शिबळापूर, निमगांव को-हाले, कासारवाडी, गळनिंब तिसगांव, रामेश्वर विद्यालय चणेगाव, प्रवरा पब्लीक स्कुल, प्रवरा सेंट्रल पब्लीक स्कुल प्रवरानगर या शाळांचा समावेश आहे.
दहावीच्या परीक्षेतही प्रवरा अव्वल स्थानावर १२ शाळा शंभरी नंबरी,मुलींची बाजी
लोणी दि.२ (प्रतिनिधी):-दहावीच्या शालांत परीक्षेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थाच्या १२ शाळा या शंभर नंबरी ठरल्या असून संस्थेच्या १ हजार ८९८ विद्यार्थ्यापैकी १ हजार ८२५ विद्यार्थी यशस्वी ठरले. असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे अशी माहीती संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी दिली
संस्था पातळीवर प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी येथील कु. अनुष्का अशोक जोंधळे ९७.४० गुण मिळून प्रथम,कु.योगिता अनिल थेटे ९६.२० टक्के आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश स्कुल, लोणी ची जानवी गोपाळराव सोलंके ९६.२० गुण मिळवत द्वितीय तर याच शाळेची कु. आस्मिता रामचंद्र गांगुर्डे ही ९६ टक्के गुण मिळवत तृतीय आली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पा., सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,शिक्षण अधिकारी नंदकुमार दळे यांनी अभिनंदन केले आहे.
दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतचं विशेषता जिरायत भागातील शाळांनी उज्वल यश संपादन केल्याने समाधान व्यक्त केले.



