spot_img
spot_img

युवापिढीला अध्यात्मिक संस्कार देण्याची गरज आहे – सोपान महाराज जाधव

लोणी दि.२ (प्रतिनिधी):-आजच्या युवापिढीला अध्यात्मिक संस्कार देण्याची गरज आहे. वारकरी शिक्षणासोबतचं गावोगावी बाल भजनी घडविण्याचे काम करावे लागेल यासाठी सर्वानीच योगदान देण्याची गरज आहे असे प्रतिपादन महर्षी संदिपानी गुरुकुल आश्रम आळंदी देवाचीचे संस्थापक ह.भ.प. सोपान महाराज जाधव यांनी केले.
 
दुर्गापुर येथे महर्षी संदिपानी गुरुकुल, आळंदी देवाची, आनंदबाबा देवस्थान आणि दुर्गापुर ग्रामस्थाच्या लोकसहभागातून आयोजित बालसंस्कार शिबीराच्या समारोप प्रसंगी ह. भ. प. जाधव महाराज बोलत होते.या शिबीरामध्ये शंभर मुलांनी सहभाग घेतला. यावेळी आ.विखे पाटील ट्रक सोसायटीचे उपाध्यक्ष सुनिल जाधव, राहाता दुध संघाचे संचालक नानासाहेब पुलाटे, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पुलाटे, मच्छींद्र जाधव, जेष्ठ साहित्यिक यशवंत पुलाटे, ह.भ.प बबन महाराज पुलाटे, ,मायराज महाराज अनर्थे,मुकेश महाराज तांबे,ज्ञानदेव पुलाटे,बबन मनकर दत्तु भारती आदी सह भाविक उपस्थित होते.
 यावेळी बोलतांना जाधव महाराज म्हणाले, या एकवीस दिवसीय बालसंस्कारातून मुलांना घडवितांना त्यांच्यातील कलागुणांना संधी देता आली. वारकरी शिक्षणासोबतचे प्रत्येक गावात आज टाळकरी घढविण्याची गरज व्यक्त केली यावेळी जाधव महाराज यांना दुर्गापुर ग्रामस्थांच्यावतीने जेष्ठ साहीत्यिक यशवंत पुलाटे यांनी लिखित सन्मानपञ प्रदान करण्यात आले. यावेळी मुकेश महाराज तांबे यांचे किर्तन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रमेश जाधव यांनी केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!