7.9 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

राज्याचे नविन साखर आयुक्त श्री. अनिलजी कवडे यांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्यावतीने स्वागत.

कोपरगांव  दि.२३( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त साखर आयुक्त म्हणून श्री. अनिलजी कवडे यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी साखर संकुल पुणे येथे नुकतेच स्वागत केले. 

महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या साखर उद्योगाबाबत विविध मुददयावर चर्चा करत सहकारातील इनोव्हेटोव्ह, सर्वोत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमतेचा आदि पुरस्कार मिळवत राज्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा नांवलौकीक असल्याची माहिती त्यांना देण्यात आली व श्री. अनिलजी कवडे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री अनिलजी कवडे यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले असल्याने स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या कार्याची माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!