राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर अ.नगर जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री. योगेश आण्णा गोंदकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अ.नगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मान्यतेने जाहीर केलेल्या कार्यकारिणीत भाजपाचा अभ्यासू आणि आक्रमक युवा चेहरा असलेल्या जितेंद्र माळवदे यांच्यावर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे.
जितेंद्र माळवदे यांच्याकडे या पूर्वी भारतीय जनता पार्टी ओबीसी युवामोर्चाच्या राहाता तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती, त्या पदावर असताना आणि राज्यात भाजपा विरोधात असताना त्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे आणि संघटनात्मक कामामुळे पक्षात त्यांचे स्थान अजून भक्कम झाले.
विद्यार्थी दशेत असताना देखील त्यांनी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून सक्रिय काम केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच प्रसारमाध्यमावर रोखठोक आणि अभ्यासू भूमिका मांडण्यासाठी त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ना.सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे.
या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना जितेंद्र माळवदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा माननीय सौ. शालिनीताई विखे पाटील, माननीय खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील, महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. राहुल भैय्या लोणीकर, अ.नगर(उत्तर) भाजपा जिल्हाध्यक्ष मा. विठ्ठलराव लंघे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा. किरणजी बोराडे, अ.नगर(उत्तर) भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. योगेश(आण्णा) गोंदकर यांचे आभार मानले.
सामान्य कार्यकर्त्याला न्याय भाजपातच मिळतो
भाजपा हा सामान्य कार्यकत्यांना न्याय देणारा पक्ष आहे. माझ्यासारख्या अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदावर बसविण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. हे वर्षे निवडणुकांचे आहे, आगामी काळात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जात, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेत, नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय ठेवत निश्चितपणाने काम करेन, अगदी प्रामाणिक काम करत पक्षनेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने करेन.
जितेंद्र लक्ष्मण माळवदे – (जिल्हा उपाध्यक्ष), भाजपा युवा मोर्चा उत्तर (शिर्डी लोकसभा)