3.1 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

प्रवरा रुरल इंजिनीरिंग कॉलेजच्या मानांकीत “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग” विभागाच्या १५ विद्यार्थ्यांची नामंकित कंपनीमध्ये निवड

लोणी दि.२४( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा रुरल इंजिनीरिंग कॉलेजच्या एन.बी.ए. मानांकीत “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल” विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या १५ विद्यार्थ्यांची ‘आर्टी फ्लो कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे’ या नामंकित कंपनीने कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून साडेतीन लाखांचे पॅकेज या मुलांना मिळाले अशी माहीती प्राचार्य. डॉ . संजय गुल्हाने यांनी दिली.

यामध्ये करण घोलप, सौरभ हासे, रवीना इलग, रोहित जाधव, अमोल कटारिया, साक्षी खर्डे, प्रतीक्षा मधे ,अभिषेक मंडलिक, पुनम शिंदे, कृष्णा सोनवणे, पल्लवी तरटे, ज्ञानेश्वरी तेलोरे, श्रेयश वाबळे, धनंजय वाडेकर व आकाश म्हसे या १५ विद्यार्थ्यांची ‘आर्टी फ्लो कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे ’ या संलग्नता करार असणाऱ्या कंपनीमध्ये निवड झाली असे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कडू यांनी सांगून प्रवरा रुरल इंजिनीरिंग कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी नेहमीच प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व प्लेसमेंट साठी विविध कोर्सेस व ऍक्टिव्हिटी चे आयोजन केले जाते. यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, ऍप्टीट्युड टेस्ट, सॉफ्टवेअर व स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, एंटरप्रीन्यूअरशिप इंटरनॅशनल प्रोग्रॅम, करियर गायडन्स, सराव मुलाखत इत्यादी उपक्रमांचा अंतर्भाव आहे.महाविद्यालयातील एन बी,ए. मानांकीत “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ” अभियांत्रिकी विभाग हा १९८५ साली सुरू झालेला पुणे विद्यापीठातील प्रथम कोर्स असून आतापर्यंत सुमारे सोळाशे विद्यार्थी पास आऊट होऊन जगातील सर्व नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे.

सदर मुलाखती दरम्यान ‘आर्टी फ्लो कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे ’ चे संचालच अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी करण्यासाठी महाविद्यालयामध्ये ‘इंडस्ट्रियल ऑटोमेशन’ हा कोर्स शिकविण्याचे प्रात्यक्षिक देण्याचे आश्वासन दिले असे विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कडू यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होण्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा.वर्षा गायकवाड-भोसले, प्रा. डॉ.प्रताप विखे, कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, विभाग प्रमुख प्रा.डॉ. चंद्रकांत कडू, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. मनोज परजने यांनी परिश्रम घेतले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.

महाविद्यालयामध्ये शिक्षणासोबत आयोजित होणारे विविध उपक्रम, एक्सपर्ट लेक्चर, गेस्ट लेक्चर, ईनटर्नशिप, इंडस्ट्रियल व्हिजिट, मॉक इंटरव्यूव याद्वारे परिपुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतो, यामुळे हे यश आम्हा मुलांसाठी महत्वपुर्ण आहे

 -करण घोलप, विद्यर्थी

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!