राहाता दि.२५( जनता आवाज वृत्तसेवा):- जिरायत भागामध्ये आपल्या शेतीमध्ये नावीन्य पूर्ण प्रयोग करतांनाचा कृषि विस्तारामध्ये योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील केलवड येथील बाळासाहेब सुधाकर गमे यांना महाराष्ट्र शासनाच्या दिला जाणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
या बाबत बाळासाहेब गमे म्हणाले,कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपला शेती व्यवसाय करतांना २०१६ मध्ये तत्कालीन कृषि मंत्री मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरु केलेल्या शाश्वत कोरवाहू शेती प्रकल्पातून शेडनेटची उभारणी करुन वीस गुंठा मध्ये शिमला मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले ४२ टनाचे उत्पादन घेतले,काकडी,मिरची भाजीपाला लागवड केली. कृषी पूरक उद्योगांमध्ये डाळ मिल नागली व इतर भरड धान्याचे पापड, लघु उद्योग सुरू केला, दुग्ध व्यवसायामध्ये मुक्त गोठा दूध उत्पादन घेतले, घरच्या शेणखणापासून गांडूळ खत तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला, व वर्मी वॉश स्लरी दशपर्णी अर्क, इतरही अनेक प्रयोग शेतामध्ये राबविले, आवर्षण प्रवनक्षेत्र दुष्काळी परिस्थितीमध्ये, शेततळ्याची उभारणी केली, अत्यल्प जमिनीमध्ये बहुविध पीक पद्धतीचा अवलंब करून कुटुंबास व इतर महिलांना रोजगार उपलब्ध झाला, तीन एकर जमिनीमध्ये आम्ही दोघे भाऊ आई वडील बंधू पोपट सुधाकर गमे मोलाचे योगदान आहे पत्नी माजी सरपंच सविताताई गमे वहीणी मनीषा गमे ह्या लघुउद्योग सांभाळतात. गांवपातळीवर बचत गट, फार्मर्स क्लबची स्थापना करून शैती व्यवसायाला चालना दिली.
यासाठी त्यांना बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राचे के प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, कृषि विभागाचे अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे विलास नलगे,उपविभागीय कृषि अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषि अधिकारी बाबासाहेब भोरे यांचे मार्गदर्शन लाभाले मिळाले.
त्यांच्या निवडी बद्दल राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पार्टील . खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन केले.