अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा): – केंद्रीय रस्ते व महामार्ग मंञी नाम.नितिन गडकरी यांचे हस्ते आज सोमवार (दि.२६) रोजी सकाळी ११ वा.नविन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प, नविन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प तसेच नविन इन्सीनरेशन बॉयलर आदींचा उद्घाटन समारंभ दूरदृश्यप्रणालीव्दारा (व्हिडीओ काॕन्फरन्सिंग) संपन्न होणार आहे. यानिमित्त श्री.गडकरी शुभसंदेशपर भाषण करणार आहेत. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे असतील तसेच याप्रसंगी जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहाणार असल्याची माहिती व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी दिली.
आज सोमवार दि.२६ रोजी सकाळी ११ वा. कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या दूरदृश्य प्रणालीव्दारा (व्हिडीओ काॕन्फरन्सिंग) होणाऱ्या उदघाटन समारंभास कारखान्याचे सभासद, शेतकरी, हितचिंतक, व्यापारी आदिंनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालक मंडळ सदस्य रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, हिंमतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, ज्ञानदेव पटारे, रामभाऊ कसार, ज्ञानेश्वर शिंदे, विरेश गलांडे, यशवंत बनकर, ज्ञानेश्वर काळे, अमोल कोकणे, यशवंत रणनवरे, प्रफुल्ल दांगट, योगेश विटनोर, सौ.हिराबाई साळुंके, सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सौ.शितलताई गवारे, अच्युतराव बडाख, अशोक पारखे, गिताराम खरात, कार्यकारी संचालक संतोष देवकर तसेच अधिकारी व कर्मचारी आदिंनी केले आहे.