पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-सवित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस् कॉमर्स ॲन्ड सायंस कॉलेज पारनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ व १४ फेब्रुवारी २०२४ रोजी युवक युवती उन्नयनीकरण कार्यक्रम व प्रशिक्षण कार्यशाळा अंतर्गत कृषी शिक्षण : शाश्वत विकासाचा पर्याय या विषया वरती कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळे मध्ये २२५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला .या कार्यशाळेचे उद्घाटन माजी प्राचार्य श्री. खासेराव शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन उसंगी त्यांनी कृषी पदवीधर यांची शाश्वत कृषी विकासातील भूमिका या विषया वरती आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की शाश्वत कृषी विकासा मध्ये पदवीदर तरुणांनी योगादन देणे आवश्यक आहे . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर सरांनी कृषी शिक्षणा विषयीची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. रविंद्र देशमुख, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. डॉ . तुकाराम थोपटे उपस्थित होते . या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. हनुमंत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर पाहुण्याचा परिचय रा से यो अधिकारी आणि तालुका समन्वयक प्रा. महेश आहेर यांनी करून दिला .
आभार रासेयो अधिकारी प्रा. डॉ. माया लहारे यांनी मानले तर कायक्रमाचे सुत्र संचालन स्वयंसेवक श्री. अभिजित बोईनवाड, कु. प्रतिक्षा लोणकर यांनी केले .तसेच द्वितीय सत्रामध्ये प्रा. डॉ . अ.द. कडलग यांनी शाश्वत कृषी उत्पादनासाठी जमीन सुपीकतेचे महत्व या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तृतीय सत्रा मध्ये प्रा . बी. एन. शिंदे यांनी शाश्वत शेतीतून पर्जन्य नियमन या विषया वरती राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. माधव शिंदे यांनी बदलती कृषी अर्थव्यवस्था : संधी आणि आव्हाने या विषयाचे सखोल मार्गदर्शन केले .
सुत्रसंचालन प्रा. डॉ . माया लहारे केले तर आभार प्रा. डॉ. हनुमंत गायकवाड रासेयो अधिकारी यांनी मानले . दि. १४/०२/२०२४ रोजी युवक युवती उन्नयनीकरण प्रशिक्षण कार्यशाळा अंतर्गत कृषी शिक्षण : शाश्वत विकासाचा पर्याय या विषयाच्या संदर्भात वडणेर हवेली ता . पारनेर याठिकाणी क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले प्रगतीशील शेतकरी श्री. बबनराव कुटे यांची शेती पाहिली यामध्ये २२५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व परिचय प्रा. महेश आहेर करून दिला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ . लक्षमणराव मतकर यांनी शहीद अरुण कुटे यांचे वडिल श्री . बबनराव कुटे ( वीर पिता ) व सौ . शांताबाई बबनराव कुटे ( वीर माता ) यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले .सर्व स्वयंसेवकांना श्री . बबनराव कुटे यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वयंसेवक श्री . अभिजीत बोइनवाड व प्रतिक्षा लोणकर यांनी केले . तर आभार प्रा. डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांनी मानले .