spot_img
spot_img

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. लिलावती सरोदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार

लोणी दि.१ (प्रतिनिधी ):-
मुलींच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या . शिक्षण संचालिका सौ. लिलावती भाऊसाहेब सरोदे यांना राज्य शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार चौंडी येथे प्रदान करण्यात आला.

ज्ञानदानाचे कार्य करत असतानाच मुलीच्या शिक्षणासाठी त्याचा विशेष पुढाकार होता. प्रवरा कन्या विद्या मंदीर, लोणी येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम त्यांनी येथे सुरू केले.प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या कॅम्पस डायरेक्टर म्हणून कार्य करताना विद्यार्थीनींच्या शिक्षणा बरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.बाभळेश्वर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असतांना तेथील अंध व मूकबधिर शाळेला नावारूपास आणण्यासाठी मोठे कष्ट घेतले.

 याशिवाय गरीब होतकरू विद्यार्थ्याना मदतही त्या करत यांची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसुल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चौंडी येथे प्रदान करयात आला.
 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!