नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- जीवनात ध्येयवादी रहा. ध्येयावर मनापासून प्रेम केले आणि ध्येय मिळविण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले तर जगातील कोणतीच ताकद तुम्हाला अडवू शकत नाही. असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रा.देविदास साळुंके यांनी केले. ते पिचडगाव येथील सुदर्शन इंग्लिश स्कूलमधील दहावीच्या निरोप समारंभात बोलत होते.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज हजारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक दत्तात्रय कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन गणेश कचरे यांनी केले.
प्रा.साळुंके पुढे म्हणाले कि पुढील जीवनात आकर्षणे खूप येतील. आकर्षणाच्या मागे लागण्यापेक्षा ध्येयाच्या मागे लागा. ध्येय मिळविले तर तुम्हाला जे जे हवे ते ते तुम्ही मिळवू शकता. सोशल मिडीयामध्ये हरवून जावू नका. स्टेटस ठेवून इतरांना तात्पुरते इम्प्रेस करण्यापेक्षा प्रामाणिक कष्ट करून स्वत:चा स्टेटस बनवा.
हनुमान माध्यमिक विद्यालय गोंडेगाव येथील मुख्याध्यापक संदीप फुलारी, पालक शिक्षक संघाचे नवनाथ हजारे, सौ.विमलताई रायकर कुळधरण, विलास साळवे, सागर कन्हेरकर तसेच विद्यार्थी मुकुंद गव्हाणे, साक्षी नवघरे, साधना गव्हाणे, सिद्धार्थ शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक कैलास कर्जुले, हनुमान गंधारे, सौ. अंजनाताई सोनवणे, मुकेश गोडे, दत्तात्रय कुळधरण हे यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन शकुर इनामदार सर, कु. कादंबरी गवळी, कु.अमृता हजारे, कु. पुजा शिरसाठ यांनी केले.