आंबी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तालुक्यातील केसापूर ग्रामपंचायत व संत लूक हॉस्पिटल श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्वरोग निदान आरोग्य शिबिर संपन्न झाले.
केसापूरच्या सरपंच सुशीला दादासाहेब मेहेत्रे यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी माजी सरपंच गुलाबराव डोखे यांनी रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे तसेच वरचेवर योग्य त्या तपासण्या करणे याबाबत माहिती देताना संत लुक हॉस्पिटल श्रीरामपूर हे नगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले हॉस्पिटल असून इतर हॉस्पिटलच्या मानाने येथे कमी खर्चात वैद्यकीय सेवा मिळते असे सांगितले. यावेळी संत लुक हॉस्पिटलच्या डॉ. मेरी साठे डॉक्टर यांनी तज्ञ डॉक्टर स्टाफ हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून २४ तास सेवा दिली जात आहे असे सांगून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना अंतर्गत निवडक आजारावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात असे सांगितले. माजी उपसरपंच दादासाहेब मेहत्रे यांनी केसापूर येथे शिबिर घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी गावातील १५५ नागरिकांनी तपासणी करून मोफत औषधे दिली.
याप्रसंगी केसापूर येथील प्रतिष्ठित नागरिक भाऊसाहेब शिंदे, सोसायटीचे चेअरमन ललित टाकसाळ, बंडूसाहेब टाकसाळ, उत्तम बोल्हे, राजेंद्र खैरे, दीपक पवार, मच्छिंद्र पवार, पोपट बोधक, जालिंदर क्षीरसागर, केरू हरदास, मोहन भगत, कुंडलिक रणदिवे, भगीरथ रणदिवे, बाळकृष्ण मेहेत्रे, जगन्नाथ हिंगे, बाळू कोतवाल, रावसाहेब पुंड, रामभाऊ देवकर, बापूसाहेब पठारे, चांगदेव डोखे, भानुदास मेहेत्रे, बाबासाहेब रणदिवे, भानुदास टाकसाळ, गंगुबाई देवकर, सुमन जगताप, शकुंतला गुलदगड यांसह आदी महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.