संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातून जाणारा नाशिक पुणे रेल्वे मार्ग आता ३० कि मी. अंतर वाढवून शिर्डीमार्गे जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात केली. त्यामुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच जाण्यासाठी स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. आशिष कानवडे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पत्र देऊन पुढाकार घेऊन लक्ष घालण्याचे साकडे घातले आहे
नाशिकला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा संगमनेर तालुक्यातील नव्हे तर शिर्डी मधून जाणार असल्याची जाहीर केले. तशी अंतिम मंजुरीही येणार असल्याचे सांगितले. रेल्वेमार्ग सिन्नर, संगमनेर असा झाल्यास सिन्नर, संगमनेर व अकोले या ग्रामीण भागातीलआर्थिक व्यवस्थेस हात भार लागणार आहे .संगमनेर तालुक्यातून जाणारा हा रेल्वे मार्ग दळवळणासाठी सोयीस्कर ठरणार आहे. हा रेल्वेमार्ग संग मनेरमार्गे गेल्यास या भागासाठी खऱ्या अर्थाने नव संजीवनी ठरणार आहे. वेळ पडल्यास स्वराज्य पक्षप्रमुख संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जन आंदोलन उभे करण्यास देखील तयार असल्याचे कानवडे यांनी पत्रात म्हटले आहे म्हटले आहे.