लोणी दि.२६ जनता आवाज वृत्तसेवा ):-काळ्या आईला म्हणजेच शेतीलाही आपल्या आईप्रमाणे जपले तर निश्चितच शेतीमधूनही चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. के.के. देखमुख यांनी प्रतिपादन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, प्रवरानगर यांचे संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी “आधुनिक शेती आणि युवक” या विषयावर पाच दिवसीय राज्यस्तरीय शिबीराच्या समारोप प्रसंगी डॉ. देशमूख बोलत होते.
आपल्या मार्गदर्शानात डाॅ.देशमुख म्हणाले, शेतीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळू शकते परंतु त्यासाठी नियमित माती परिक्षण, पाणी परिक्षण करुन जमीनीचे आरोग्य सांभाळले पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या प्रकारचे उत्पादन शेतीमधूनही मिळू शकते. “चला जपू या मातीचे आरोग्य” हा मुलमंत्रही सर्वांनी आचरणात आणला पाहिजे. एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी किमान ३०० ते ५०० वर्ष लागतात, तेंव्हा मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. आजच्या तरुणांनी गावाच्या कट्टयावर न बसता आपली शेती मनापासून केली तर त्यामधूनही ब-यापैकी उत्पन्न मिळू शकते. असेही त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,कार्यक्रम अधिकारी डॉ. बाळासाहेब मुंढे,कॅम्पचे संचालक डाॅ.राम पवार आदीसह राज्यभरातून आलेले स्वयंसेवक उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांनी प्रास्ताविकांमध्ये शेतीमध्ये जो कष्ट करतो, त्याला यश मिळते.या शिबीराचा गोषवारा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बाळासाहेब मुंढे यानी घेतला. या शिबीरार्थीना कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख, गोदागिरी फार्म, श्रीरामपूर चे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश औताडे, कृषि व संलग्नीत महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे डॉ. महाविर सिंग चौहाण, आय.सी.ए. आर. बायोटेक्नॉलॉजीकल कंट्रोल युनिट, लखनौ, प्रवरानगर केंद्राचे डाॅ.डि.एन. बोरासे,डाॅ.योगेश थोरात,विखे पाटील महाविद्यालयांचे डाॅ.भागवत उफाडे यांनी मार्गदर्शन केले. शिबीरार्थीना महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, गोदागिरी फार्म, श्रीरामपूर, अगरबत्ती प्रकल्प, प्रवरानगर अशा विविध ठिकाणी भेटी देऊन शिबीरार्थीना मार्गदर्शन केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. विजय खर्डे, प्रा. डॉ. श्रीमती एस.आर. लामखेडे, प्रा.डॉ.डी.एस.तांबे, प्रा.पी.एल. हराळे, प्रा.डॉ. एस.आर. सुसर, प्रा.डी.एस. औटे, प्रा.एस.एस. लोखंडे, प्रा.डॉ.एस.आर. गाढवे, प्रा.सौ.एस.एस.शेख, कु. वाय.बी. खर्डे यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ.शांताराम चौधरी आणि प्रा. कु.सुरभी भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. राम पवार यांनी केले.