लोणी दि.२६( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या फार्मसी कॉलेज (महिला) चिंचोली (ता. सिन्नर) येथील अंतिम वर्ष पदवी आणि एम. फार्मसीच्या दहा विद्यार्थिनींची विविध नामांकीत कंपन्यामध्ये निवड झाल्याची माहीती प्राचार्या डाॅ.चारुशिला भंगाळे यांनी दिली.
महाविद्यालयामार्फत स्वतंञ प्लेसमेंट सेल कार्यरत या अंतर्गत वेनश्योर फार्मास्युटिकल,मुंबई,टाटा कसल्टेसी,पुणे आणि जेनोन बायोटेक सिन्नर या कंपनीच्या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये रिया टकले, तनवी वाटपाडे,. प्रियंका बोबडे,निकिता महापुरे, वर्षा पांगळे, सेजल म्हसे, जागृती सोनवणे, सोनल गोंदकर,आदिती जोशी, हर्षदा गुरगुडे यांची कंपनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये चांगल्या वेतनावर निवड झालेली आहे.सदर मुलींमध्ये काही विद्यार्थिनी चतुर्थ वर्षाच्या असून त्यांना लगेचच रुजू होण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे.
सदर विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,सह सचीव भारत घोगरे,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्र मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ प्राचार्य डॉ. चारुशीला भंगाळे, प्रवरा प्लेसमेंट अधिकारी प्रा. मनोज परजणे, डॉ.सोमेश्वर मनकर, तसेच महाविद्यालाचे प्लेसमेंट अधिकारी प्रा. विकास कुंदे यांचे मार्गदर्शन लाभले.