कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- बाल गोकुळ अकॅडमी या इंग्रजी माध्यमातील शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळच्या आल्हादायक व प्रसन्न वातावरणात पार पडले. स्नेहमेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री डॉ. जयराम खंडेलवाल , प्रमुख पाहुणे भगवानराव खर्डे पाटील व पालक प्रतिनिधी गुलाबभाई पठाण हे मान्यवर होते.
डॉ. जयराम खंडेलवाल यांनी पालकांना उद्बोधन करताना म्हटले की, लहान मुलाला मातीच्या गोळ्याप्रमाणे आकार देण्याचे काम विविध शैक्षणिक उपक्रमातून बालगोकुलम मधील शिक्षक गेल्या १० वर्षापासून तन ,मन ,धन अर्पण करून करतात. आपल्या पाल्याचा शैक्षणिक पाया हा बाल गोकुलम् या शाळेत नक्कीच भक्कम होतो, याची मला खात्री आहे. सर्व पालकांनी आपले मुले घडविण्यासाठी शाळेत होणाऱ्या स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, बाल आनंद मेळावा, शिवजयंती अशा विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांनी शिवाजी राज आलं राज, काय सांगू राणी मला गाव सुटेना, देवा श्री गणेशा जय श्रीराम, जो केशरी लाल ,भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा , देशभक्ती पर गीते, बाई पण भारी देवा ,मै निकला गड्डी ले के ,लुट गया, जय हो, बुद्ध सा मन , करंट लगा करंट लगा, सॉरी सॉरी, दाक्षिणात्य भारतीय नृत्य सादर केले.
शाळेचे संचालक प्राध्यापक सोन्याबापू मोरे,मुख्याध्यापिका शारदा मोरे व सहशिक्षिका रेवती ससाने ,माधुरी निबे,प्रतीक्षा राऊत, प्रतीक्षा कोल्हे, तेजश्री कडनोर ,संतोषी मोरे, रेणुका लोखंडे ,स्नेहा वाघमोडे या सर्वांनी स्नेह मेळावेचे उत्कृष्ट नियोजन यशस्वीरित्या पार पाडून पालकांची विद्यार्थ्यांची ग्रामस्थांची व संस्थेच्या पदाधिकारी वर्गाची कौतुकाची छाप मिळवली.