यावेळी कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी,प्रा.प्रविण गायकर, डॉ.अमोल सावंत, प्रा.मनीषा आदिक, प्रा.स्वरांजली गाढे, प्रा.मिनल शेळके, डॉ.सरिता साबळे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रवरेच्या कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी सुसंवाद
लोणी दि.३१ (प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण झाल्या नंतर कोणते क्षेत निवडावे तसेच पदव्युत्तर पदवीसाठी कोणकोणत्या परीक्षा दिल्या पाहिजे या हेतू लोणी येथील लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी सुसंवाद व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी जैवतंत्रज्ञान येथील माजी विद्यार्थी ओमप्रकाश शेटे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक प्रवासा बद्दल माहिती करून दिली तसेच सध्या ते शिक्षण घेत असलेल्या आय.आय. टी दिल्ली मधील कम्प्युटेशनल बायोलॉजि या विषयावर सखोल मार्गदर्शन करून त्यासंदर्भात होणाऱ्या विविध परीक्षेबद्दल माहिती करून दिली.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समन्वयक सहाय्यक प्रा. सारीका पुलाटे यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार अदिती कोरडे यांनी केले.



