महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत कार्यालय, लोणी बुद्रुक यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित आदर्श महीला गौरव कार्यक्रमात सौ विखे पाटील बोलत होत्या. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक संपतराव विखे, सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोकराव धावणे, उपाध्यक्ष जालींदर विखे, उपसरपंच गणेश विखे, मंजुश्री साबळे, किशोर धावणे, भाऊसाहेब विखे, विकास म्हस्के, नामदेव वाबळे, सोपानराव विखे,नवनीत साबळे, ग्रामविकास अधिकारी संतोष भिंगळे आदीसह महीला उपस्थित होत्या.
महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा आदर्श घेऊन काम करावे- सौ.शालीनीताई विखे पाटील
लोणी दि.३१( प्रतिनिधी):-महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा आदर्श घेऊन काम करावे. कितीही संकट आले तर त्याचा सामना करता येतो. महिलांनी चौकटीच्या बाहेर पडून काम करावे अहिल्यादेवी जयंतीनिमित्त गावोगावी आयोजित केलेल्या महिलांचा गौरव हा महत्वपूर्ण असून राज्य सरकारचा हा निर्णय महीलांसाठी प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
यावेळी जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून महीलांसाठी कार्य करणा-या प्रकल्प संचालिका सौ. रुपाली लोंढे, आरोग्य क्षेत्रात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा हॉस्पिटल लोणी येथील सौ. शोभा हासे यांना यावर्षीचा आदर्श अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित मान्यवरांनी सन्मानित करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शन सौ. विखे पाटील यांनी अनेक संकटावर मात करून अहिल्यादेवीनी केलेल्या कार्याचा गौरव करतांनाचा महिल देखिल संकटातून मार्ग काढत पुढे जावू शकते. स्वता: कमी न लेखता आहिल्यादेवीचा इतिहास समजून घ्या तो वाचा आणि संकटावर मात करा चौकटीच्या बाहेर पडा असा संदेश यानिमित्ताने देतांनाच महिलचा आजच्या दिनी होणाऱ्या सन्मान सोहळा हा राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगत शासनाचे अभिनंदन केले.
यावेळी पुरस्कार प्राप्त सौ. रूपाली लोंढे यांनी मनोगत व्यक्त करत हा पुरस्कार म्हणजेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच प्रास्ताविक संतोष थिगळे यांनी केले.
राज्य सरकारच्या वतीने अहिल्यादेवी जयंती निमित्त होणारा गौरव हा महिलांसाठी प्रेरणा देणारा आहे.यामुळे महिलांना काम करण्यास नवी ऊर्जा मिळले.संकटाला समोरे जाता येईल या निर्णयाचे सौ.विखे पाटील यांनी स्वागत करत शासनाचे आभार मानले.



