spot_img
spot_img

राज्यस्तरीय आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार लोणीच्या प्रा. लोळगे यांना प्रदान

लोणी दि.३१ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्रा. अशोक लोळगे यांना राज्यस्तरीय पुणे विभागीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ हा जेष्ठ हिंदी साहित्यीक डॉ. दामोदर खडसे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे दोन दिवसीय अधिवेशन बारामती येथे पार पडले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक संघाच्या वतीने दरवर्षी राज्य स्तरीय, विभाग स्तरीय व जिल्हा स्तरीय आदर्श हिंदी शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी पुणे विभागाचा हा पुरस्कार पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय प्रवरानगर, लोणी येथील हिंदी विषयाचे प्रा. अशोक लोळगे यांना पुणे विभागीय पुरस्कार जेष्ठ हिंदी साहित्यीक डॉ दामोदर खडसे आणि व प्रमुख अतिथी डाॅ. पांडुरंग चोरमले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी संघाचे राज्याध्यक्ष डॉ मिलींद कांबले, कार्याध्यक्ष प्रा सुंदर लोंढे, सचिव प्रा. रेवणनाथ कर्डीले, प्रा. नेहा बोरसे, जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश म्हसे तसेच राज्यभरातून आलेले हिंदी विषयाचे कनिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते.

 प्रा. अशोक लोळगे यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खा.डाॅ.सुजय विखे पाटील,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, अतांञिकचे संचालक डॉ प्रदीप दिघे, प्राचार्य डाॅ.अण्णासाहेब तांबे, प्रा. नामदेव तांबे आदींनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!