spot_img
spot_img

टाकळीभान उपबाजार आवाराचे काँक्रीटीकरण आणि महिला स्वच्छ्तागृहाचा प्रश्न सुटणार.संचालक मयुर पटारे आणि विद्याताई दाभाडे यांच्या मागणीला यश.

टाकळीभान( प्रतिनिधी):-गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात काँक्रीटीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता. दरवर्षी पावसाळ्यात शेतकरी आणि व्यापारी यांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यासाठी नूतन संचालक मयुर पटारे आणि विद्याताई दाभाडे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली कालच्या मासिक बैठकीत जोरदार मागणी केली होती. त्याच अनुषंगाने आज आवारात त्वरित कार्यवाही करत सभापती सुधीर नवले यांच्या आदेशाने मोजमाप करण्यात आले.

तसेच टाकळीभान उपबाजार आवारात मोकळ्या कांद्याचे मार्केट सुरू झाल्याने अनेक महिला याठिकाणी काम करतात. त्यांच्यासाठी याठिकाणी स्वच्छ्तागृह करणे गरजेचे असल्याचे मत दोन्ही संचालकांनी बैठकीत मांडले होते. त्यालादेखील सभापती सुधीर नवले यांनी हिरवा कंदील देत त्वरित काम सुरू करण्याचे आदेश दिले. हे दोन्ही गंभीर स्वरूपाचे प्रश्न सुटणार असल्याने शेतकरी, व्यापारी आणि महिला वर्गातून दोन्ही संचालकांचे कौतुक होत आहे.

याप्रसंगी बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, विलास दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, माजी उपसरपंच भारत भवार, प्रहारचे तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे, महेंद्र संत, मोहन रणनवरे, बाजार समितीचे सचिव साहेबराव वाबळे, दिनकर पवार उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!