कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामदैवत श्री भगवती माता मंदिर तसेच कोल्हाळेश्वर महादेव मंदिरासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, श्री शनैश्वर, श्री महालक्ष्मी मंदिर व म्हसोबा मंदिर अशा सहा देवालयांचे व्यवस्थापन कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टकडून केले जाते. ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. मागील विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर अहमदनगरच्या धर्मादाय उप आयुक्तांनी एकूण १५ उमेदवारांचा समावेश असलेल्या व दाखल झालेल्या पॅनेलमधील प्रत्येक उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेऊन फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी नूतन विश्वस्त मंडळातील १५ नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली होती. विश्वस्त मंडळात आठ विश्वस्त कोल्हार बुद्रुकचे तर सात भगवतीपूरचे रहिवासी आहेत.
कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टच्या अध्यक्षपदी सयाजी खर्डे, तर उपाध्यक्षपदी साहेबराव दळे यांची निवड
कोल्हार ( प्रतिनिधी ) :- कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी सयाजी रघुनाथ खर्डे यांची तर उपाध्यक्षपदी साहेबराव सखाराम दळे यांची सर्वानु मते निवड आली. तसेच खजिनदार म्हणून डॉ. भास्करराव निवृत्ती खर्डे यांची तर सचिवपदी संपत विठ्ठलराव कापसे यांची निवड करण्यात आली.
विश्वस्त मंडळातील नवीन विश्वस्तांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर विश्वस्तांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी म्हणून कोणाची निवड होते याची दोन्हीही गावच्या ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता होती. नुतन विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी सयाजी रघुनाथ खर्डे पाटील यांच्या नावाची सूचना चंद्रभान अप्पासाहेब खर्डे यांनी मांडली त्यास अजित रमेश मोरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी साहेबराव सखाराम दळे यांच्या नावाची सूचना विजय माधवराव निबे यांनी मांडली त्यास सर्जेराव सोन्याबापू खर्डे यांनी अनुमोदन दिले.
याप्रसंगी देवालय ट्रस्टचे विश्वस्त चंद्रभान आप्पासाहेब खर्डे, संभाजी रघुनाथ देवकर, लक्ष्मण बाळासाहेब खर्डे, विजय माधवराव निबे, सर्जेराव सोन्याबापू खर्डे, नानासाहेब दगडू कडसकर, जनार्दन सर्जेराव खर्डे, अजित रमेश मोरे, वसंत नानासाहेब खर्डे, सुजीत लक्ष्मण राऊत उपस्थित होते.
यावेळी डॉ. भास्करराव खर्डे म्हणाले, नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व विश्वस्त देवालाय ट्रस्टचा चांगला कारभार करू. कामकाजात आणखी सुधारणा करून नवीन प्रकल्प राबविले जातील. ट्रस्टच्या माध्यमातून भरीव काम करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेच्या नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. भास्करराव निवृत्ती खर्डे, सौ. अर्चना पंढरीनाथ खर्डे, राजेंद्र प्रभाकर राऊत यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विखे पा. कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे यांनी केले.



