spot_img
spot_img

झेंडू लागवड तंञज्ञान समजून घ्यावे – भरत दंवगे कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर अंतर्गत झेंडू पिकांवर शेतीशाळा 

लोणी दि.१( जनता आवाज वृत्तसेवा ):-झेंडू लागवड तंञज्ञान समजून घेत शेतक-यांनी लागवड करावी.योग्य वेळी पिकसंरक्षण करतांना एकात्मिक किड नियंञण करतांना योग्यवेळी योग्य फवारणी केल्यास या पिकृंपासून चांगले उत्पादन मिळते.आज या पिकांमध्ये मोठे संशोधन झाल्याने नवीन तंञज्ञानाचा अवलंब करुन पुढे जावे असे प्रतिपादन बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राचे पिक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दंवगे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर यांच्यावतीने खंडाळा येथे आयोजित झेंडू पिकांच्या शेती शाळेत ते बोलत होते.यावेळी प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, पिक संरक्षण विभाग प्रमुख भरत दवंगे,उद्यान विद्या विभागाचे डाॅ.विलास घुले,विस्तार विभागाच्या प्रियंका खर्डे उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात दंवगे यांनी झेंडू पिकांचे एकात्मिक व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग नियंत्रण, झेंडू पिकातील प्रमुख समस्या, रोगांची लक्षणे आणि उपाय योजना या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी शेती शाळेच्या माध्यमातून झेंडू पिकांचे व्यवस्थापन कसे करायचे, तसेच फुलशेती शेतीसाठी विविध शासकीय योजना याबद्दल माहिती दिली.यावेळी डाॅ.विलास घुले यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका खर्डे यांनी करतांना शेती शाळेचे महत्व आणि उपक्रमांची माहीती दिली.या शेती शाळेत खंडाळा येथील झेंडू उत्पादन उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!