spot_img
spot_img

निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न -महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी दि.३० (प्रतिनिधी):-निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यातून पाणी सोडण्‍याची प्रथम चाचणी होणे हा उत्‍तर नगर जिल्‍ह्यातील जिरायती लाभक्षेत्रातील शेतक-यांच्‍या जीवनातील सर्वौच्‍च आनंददायी क्षण आहे. वर्षानुवर्षे पाण्‍याच्‍या प्रतिक्षेत असलेल्‍या लाभक्षेत्राला आता निळवंडे धरणाच्‍या पाण्‍याचा लाभ लवकरात लवकर मिळवून देण्‍यासाठी भविष्‍यात प्रयत्‍न असतील असे प्रतिपादन महसूल,पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

निळवंडे येथे बुधवारी कालव्‍यातून पाणी सोडण्‍याची पहिली चाचणी संपन्‍न होत आहे. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न होत असलेला हा कार्यक्रम सर्वांच्‍याच दृष्‍टीने महत्‍वपूर्ण ठरणार आहे. वर्षानुवर्षे पाण्याच्‍या प्रतिक्षेत शेतकरी होते. या सर्वांची इच्‍छा यानिमित्‍ताने पुर्ण होत असल्‍याचे समाधान त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

 धरण आणि कालव्‍यांचे काम होत असताना यामध्‍ये अनेकांनी सोईनूसार राजकीय भूमिकाही बजावल्‍या. आम्‍ही कालवे होवू देत नाही असे बेजबाबदारपणाचे आरोप करुन, विखे कुटूंबियांना बदनाम करण्‍याचेही प्रयत्‍न वेळोवेळी झाले. परंतू मुळात धरणाच्‍या मुखापाशीच कालव्‍यांची कामे सुरु नव्‍हती तरीही खालच्‍या भागातील काही लोकांनी राजकीय आणि व्‍यक्तिव्‍देशातून आंदोलने सुरु करुन या विषयाला वेगळे वळण देण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतू आपणास ज्‍या ज्‍या वेळी संधी मिळाली त्‍यावेळी धरणाच्‍या निधीची उपलब्‍धता व्‍हावी म्‍हणून, केंद्र आणि राज्‍य सरकारकडे प्रयत्‍न केले. विरोधी पक्षनेता असतानाही तत्‍कालिन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे निधीसाठी आणि कालव्‍यांची कामे मार्गी लागावी म्‍हणून पाठपुरावा केला.
केंद्र सरकारच्‍या जलशक्‍ती मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून तत्‍कालिन मंत्री नितीन गडकरी यांनीही निधी उपलब्‍ध होण्‍यासाठी सहकार्य केले. धरणाच्‍या मुखाच्‍या २०‍ कि.मी अंतरावरील कालव्‍यांची कामे सुरु व्‍हावीत म्‍हणून जेष्‍ठनेते मधूकरराव पिचड यांच्‍या सहकार्याने आणि तत्कालिन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थित झालेल्‍या बैठकीत झालेल्‍या महत्‍वपूर्ण निर्णयांमुळेच आजचा दिवस सर्वांना पाहायला मिळाला आणि हा प्रकल्‍प मार्गी लागण्यास पाठबळ मिळाले असल्‍याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
राज्‍य सरकारने या प्रकल्‍पासाठी आता ५ हजार ७०० कोटी रुपयांच्‍या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्‍यता दिल्‍याने या प्रकल्‍पातील सर्वच अडथळे आता दुर झाले आहेत. धरणाच्‍या लाभक्षेत्रातील सर्वच तालुक्‍यातील कालव्‍यांची कामे मार्गी लागत आहेत. डाव्‍या कालव्‍याबरोबरच उजव्‍या कालव्‍याचीही कामे दोन महिन्‍यात पुर्ण करण्‍याचे उदिष्‍ठ ठेवण्‍यात आले असून, धरणातील पाण्‍याचा लाभ शेतक-यांना निर्धारित वेळेत व्‍हावा यादृष्‍टीनेच आता पुढील काही महिन्‍यांचे नियोजन करण्‍याच्‍या सुचना जलसंपदा विभागाला देण्‍यात आल्‍या असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!