spot_img
spot_img

सात्रळ महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थ्यांना मिळाली करियर ची संधी ; नोकरीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

साञळ दि.३०( प्रतिनिधी ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ च्या ४० विद्यार्थ्याचे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे यात १० विद्यार्थी किनोमेरा बायोसायन्सेस १६ विद्यार्थी मॅकलॉइड फार्मासिटिकल ०२ विद्यार्थी एम. एस एन लॅबोरेटरीज हैदराबाद, ०१ विद्यार्थी डेल्टाफिनोकेम, ०१ विद्यार्थी हार्मन फिनोकेम. ०१ विद्यार्थी आर. पी. जी. लाईफ सायन्सेस ०४ विद्यार्थी एच.डी.एफ.सी बँक तर इतर ०४ अशी माहिती प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी दिली.

 निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पा यांनी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी प्लेसमेंट सेल ने आयोजित विविध उपक्रमात भाग घेऊन आपला व्यक्तिमत्व विकास करावा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करावे असे आवाहन केले.

यावेळी प्लेसमेंट विभाजाच्या प्रमुख डाॅ.छाया कारले यांनी सांगितले,संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने महाविद्यालयात ट्रेनिंग प्लेसमेंट सेल ची स्थापना करण्यात आली. या सेल अंतर्गत विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केले जातात जसे की संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, कम्युनिकेशन स्किल इंटरव्यू टेक्निक, कंपनी व्हिजीट आणि विविध प्रकारचे ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित केले जातात यात विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकास केला जातो तसेच बौद्धिक विकास केला जातो यासाठी प्रशासन तसेच ट्रेनिंग प्लेसमेंट सेल आणि मॅनेजमेंट नेहमीच तत्पर असते आणि याचमुळे शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये ४० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या यासाठी महाविद्यालय वेगवेगळे तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करते यासाठी महाविद्यालयाला माजी विद्यार्थ्यांचे फार मदत होते.अतिशय ग्रामीण भागात असलेल्या सात्रळ महाविद्यालयाने आपल्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावत ठेवलेला आहे आणि भविष्यातही तो असाच वाढत राहील. यासाठी महाविद्यालयास माजी विद्यार्थी डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर पाचारणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावर्षीही नामांकित कंपनी चे मुलाखतीचे आयोजन करून महाविद्यालय विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करियर च्या संधी उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या समन्वयक सौ. छाया कार्ले यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये ट्रेनिंग प्लेसमेंट सेल च्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, संस्थेचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. मनोज परजणे, प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप यांचे मादर्शन लाभले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!