संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-अनेक अडचणीवर मात करत आ.बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण पूर्ण केले. धरणाच्या कालव्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवला. परंतु काही नेते कालवे पूर्ण होताच त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. हे लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी ओळखले असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळे झालेली निर्णय धरण आणि कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात यांनी केले आहे.
देवगांव येथे बधरा पाणी पुजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अमृतवाहिनी बँकेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे, कैलास पानसरे ,रामदास पा.वाघ ,सरपंच अर्चनाताई लामखडे ,सुनिता पावसे, मेजर प्रकाश कोटकर, डॉ प्रमोद पावसे, बाळासाहेब शिंदे ,रावसाहेब कोटकर, नानासाहेब वर्पे आदीं उपस्थित होते .
यावेळी इंद्रजीतभाऊ थोरात पुढे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी मा.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली अनेक अडचणीवर मात करून काम पूर्ण केले. धरणामध्ये पहिल्यादा 2014 ला पाणी अडविण्यात आले. परंतु त्यानंतर सरकार गेले व निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे पूर्णता ठप्प झाली. भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोणतीही काम झाले नाही. परंतु 2019 ला पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आले त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा कालव्याच्या कामांना गती देण्यास सुरुवात केली. जयंत पाटील अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी निधीची कमतरता पडू दिली नाही. कालव्यांचे कामात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कालवे पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्याची तयारी चालू असतानाच पुन्हा एकदा सरकार बदलले आणि भाजप पुन्हा सत्तेवर आले. धरणात 10 टीएमसी पाणी असून सुद्धा कालव्यांना पाणी सोडण्यात येत नव्हते म्हणून आ. बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनाचा इशारा देत विधानसभेमध्ये सरकारला धारेवर धरले त्यामुळे दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले.
1 फेबुवारीला राहुरी तालुक्यासाठी 10 दिवस व नंतर संगमनेर तालुक्याला पाणी देण्यात आले. पाणी येत असताना अनेक अडचणी वर मात करून तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची मदत घेऊन आपण आज देवगावच्या बंधाऱ्यात पाणी अडवले आहे. आपण कायम आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. देवगाव परिसरात पाणी आणण्याकरिता ग्रामस्थानी विशेषतः तरुणांनी मदत केली. त्यामुळे गावात पाणी आणणे शक्य झाले. काही विरोधी नेते धरणाचे व कालव्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु तालुक्यातील जनतेला हे पूर्णतः माहिती आहे की पाण्याकरिता काँग्रेसचे नेते मा.महसुलमंत्री. आमदार बाळासाहेब थोरात यांनीच संघर्ष केला आहे म्हणून पुढील काळात कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक करताना प्रकाश कोटकर म्हणाले की, पाणी आणण्याकरिता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची मोठी मदत मिळाली असून गावातील तरुणांनी यासाठी उत्साह दाखवला. त्यामुळेच हे शक्य झाले आहे आमदार बाळासाहेब थोरात हे आपले जलनायक आहे. म्हणून आम्ही सर्व आ. थोरात साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी दिनेश बांगर ,शरद कोटकर, रमेश वरपे ,अजय पावसे, संतोष कोटकर, विक्रम कोटकर, सुखदेव पावसे ,बबन पावसे, संजय शिंदे ,देवगाव पाणी कृती समिती तसेच ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.