23.8 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे खा. विखेंच्या हस्ते विविध कर्तृत्ववान महिलांचा सन्मान.. 

श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ):-जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ काल १ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रांत बहुमूल्य कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना एक प्रकारे समाजात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा संदेश उपस्थित महिलांना खासदार विखेंनी दिला.

यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शितल गवते, बेलवंडी येथील गूळ व्यवसाय करणाऱ्या सपना भोसले, आढळगाव येथील ड्रोन व्यवसाय करणाऱ्या पूजा घोलप, मढेवडगाव येथील आदर्श महिला व्यवसाय करणाऱ्या नयनतारा शिंदे, मजुरी व मसाला व्यवसाय करणाऱ्या मांडवगण येथील आसमा काझी, दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या येळपणे येथील अनिता डफळ, श्रीगोंदा येथील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या ज्योती चाकणे, कापड बॅग व्यवसाय करणाऱ्या श्रीगोंदा येथील कोमल दांडेकर आणि कर्जत तालुक्यातील मौजे जलालपूर येथील शेती व शेतीपूरक व्यवसाय बचत गटाच्या अश्विनी तांदळे आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.

दरम्यान या सर्व महिलांचे सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन करून पुढील व्यावसायिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या माध्यमातून व्यवसायवृद्धी होऊन महिलांसाठी रोजगार निर्मिती देखील व्हावी ही सदिच्छा व्यक्त केली. सदरील कार्यक्रमास तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हा सोहळा ऐतिहासिक बनवला. प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजित विविध कार्यक्रमांचा महिलांना यावेळी मनसोक्तपणे आनंद घेतला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!