20 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

पोलिओ लसीकरण मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा रोटरीचे क्लब ऑफ संगमनेरचे वतीने आवाहन

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-भारत सरकारद्वारा राबविल्या जात असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 मध्ये शहरातील व ग्रामीण भागातील सर्व सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ संगमनेरतर्फे करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती देतांना अध्यक्ष आनंद हासे यांनी सांगितले की, रोटरी क्लब जगभरात पोलिओ निर्मुलनामध्ये महत्त्वाचा सहभाग नोंदवित आहे. महाराष्ट्रात १९९५ राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविली जाते. भारत पोलिओमुक्त आहे, परंतु शेजारील काही देशांमध्ये पोलिओ रुग्ण अजूनही आढळत आहेत. त्यामुळे पोलिओ भारतात परत येण्याचा धोका संभवू शकतो. नागरिकांनी आपल्या बालकाच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी जेव्हा जेव्हा लसीकरण मोहित राबविली जाणार आहे त्या वेळी ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओची लस देणे गरजेचे आहे.

याबाबत निवृत्त वैद्यकीय अधिकारी व रोटरी पोलिओ निर्मुलनचे सदस्य डॉ. किशोर पोखरकर यांनी सदर लसीकरण गावातील प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अगंणवाडी केंद्र व संगमनेर ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी, कॉटेज हॉस्पिटल नगरपरिषद आदि ठिकाणी ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत राबविण्यात येणार असून या लसीकरणात रोटरी क्लब ऑफ संगमनेर सक्रीय सहभागी असल्याची माहिती दिली.

तरी सदर लसीकरणास सर्व नागरीकांनी आपल्या बालकांना केंद्रापर्यंत घेऊन यावे अशी विनंती सचिव मधुसूदन करवा यांनी केली.

 

 पोलिओ लसीकरण पुन्हा करणे का गरजेचे

भारतातून पोलिओचे समूळ उच्चाटन झाले आहे, परंतू जगभरात काही देशांमध्ये तो अजूनही आढळत आहे, भारताच्या शेजारीला राष्ट्रांमध्ये सुद्धा तो सापडला आहे, त्यामुळे भविष्यात काही वर्षांपर्यंत तरी लसीकरण राबविणे गरजेचे आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!