spot_img
spot_img

माहेश्वरी समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर :- सौ. शालिनीताई विखे पा.

कोल्हार ( वार्ताहर ) :- प्रवरा परिसरात माहेश्वरी समाज संख्येने अत्यल्प असला तरी शिक्षण, व्यापार, आरोग्य, समाजसेवा या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यागाची भावना या समाजामध्ये आहे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून हा समाज लोकांशी समरस झालेला असून हे वाखाणण्याजोगे असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.
कोल्हार भगवतीपूर येथे जैन स्थानकात महेश नवमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सौ. विखे पाटील बोलत होत्या. याप्रसंगी प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष अशोकलाल आसावा, विखे पा. साखर कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, ऋषिकेश खांदे, विठ्ठलदास आसावा, जगदीश तापडिया, ब्रिजमोहन बिहाणी, विनोद भुतडा, रामविलास आसावा, जगदीश सारडा, रामचंद्र राठी, सौ. स्वाती गिलडा, सौ. प्रियंका आसावा आदी व्यासपीठावर विराजमान होते.
प्रवरा परिसर माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित महेश नवमीनिमित्त सकाळी येथील श्री कोल्हाळेश्वर महादेव मंदिरामध्ये अभिषेक पूजा करण्यात आली. गावातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये पारंपारिक माहेश्वरी पोशाख परिधान केलेले महिला – पुरुष, युवक – युवती सहभागी होते. शोभायात्रा जैन स्थानकामध्ये पोहोचल्यानंतर माहेश्वरी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत मुला – मुलींचा सन्मान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. 
यावेळी अशोकलाल आसावा, जगदीश तापडिया, रोहित आसावा, कु. प्रतीक्षा आसावा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मयूर असावा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बंग, कु. वैष्णवी आसावा, कु. शिवानी आसावा यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयूर आसावा, गोपाल बंग, गणेश मुंदडा, संजय आसावा, आशिष मुंदडा, सतीश बंग, रामेश्वर गिलडा, राहुल बंग, दर्शन आसावा आदि प्रयत्नशील होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!