22.3 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

संगमनेरला पोलिसांनी पकडला ९ हजार रुपयांचा गांजा ,गांजा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक 

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर शहरातील शिवाजीनगर भागात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या ठिका णावर शहर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यामध्ये ९ हजार रुपये किमतीचा९८० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे .या प्रकरणी पोलिसांनी वैदुवाडी येथील गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

संगमनेर शहरातील शिवाजीनगर भागामध्ये अवैधरित्या गांजाची विक्रीहोत असल्याची गुप्त माहिती खबऱ्यायामार्फत पोनि भगवान मथुरे यांना समजली.त्यांनी त्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस पथकास छापा टाकण्याचे आदेश दिले . त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलीस पथकानेशिवाजी नगर परिसरामध्ये शोध घेत असताना पथ कास वैदुवाडी जवळील रस्त्याच्या कडेला एका जणांची संशयित हालचाल पोलिसां च्या लक्षात आली. पोलीस पथक त्याच्या हालचाली वर लक्ष ठेवून होते. त्याचवेळी प्रशांत पोपट घेगडमल हा येणाऱ्या व्यक्ती कडून पैसे घेऊन काहीतरी पुढे देत होता त्यानंतर पोलिसांनी चारही बाजूने त्याच्या वर छापा टाकला .आणि त्याची झढती घेतली असता त्याच्याकडे ९ हजार रुपये किमतीचा ९८० ग्रॅम वजनाचा गांजा आढ ळून आला.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पो हे कॉ रोहिदास शिरसाट यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी प्रशांत पोपट घेगडमल मूळ राहणार हिवरगाव पावसा हल्ली राहणार कासारा दुमाला याच्या विरोधातअमली औषधी द्राव्य मन प्रभावी अधिनि यमाच्या कलम आठ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे .

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!