22.3 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

जि.प.पिंपरी जलसेन शाळेचा विद्यार्थी साकारतोय छत्रपती राजारामाची भूमिका.

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पिंपरी जलसेन येथील युद्धवीर गौरव भालेकर हा इयत्ता चौथी शिकणारा विद्यार्थी अहमदनगर येथे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या महानाट्यात छत्रपती राजाराम महाराज यांची भूमिका साकारली आहे.

युद्धवीर भालेकर हा पारनेर चे प्रसिद्ध उद्योजक गौरव भालेकर यांचा मुलगा आहे तो शाळेत विविध स्पर्धेत सहभाग घेत असतो.

पारनेर तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून जिल्हा परिषद पिंपरी जलसेन शाळा संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या शाळेतून होत आहे परिसरातील विविध गावांमधून पालक या शाळेत पाल्यांचा प्रवेशासाठी उत्सुक असतात.

विविध गुणदर्शन स्पर्धा वेशभूषा आदी स्पर्धा शाळा स्तरावरील उपक्रमात विविध युद्धवीरचा सहभाग असतो युद्धवीर च्या या कलागुणांना ओळखून त्याला नगरच्या छत्रपती संभाजी या महानाट्यात छत्रपती राजारामांची भूमितीची संधी प्राप्त झाली या त्याच्या यशाबद्दल पालक शिक्षक व ग्रामस्थांनी त्याची अभिनंदन केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अर्जून भालेकर त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक देवराम पिंपरकर सतीष भालेकर सरपंच सुरेश काळे प्रशासकीय अधिकारी दौलत येवले तबाजी केसकर गटशिक्षणाधिकारी सीमाताई राणे यांनी त्याची कौतुक केले.

 जिल्हा विविध गुणदर्शन स्पर्धेत शाळेची यशस्वी कामगिरी.

तालुका पातळीवर स्पर्धेतील या शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत राधिका राहुल ढवण ,वेशभूषानुसार सादरीकरण स्पर्धेत तनिष्का गणेश औटी व आदिती सुरेश वाव्हळ व वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत प्रांजल सतीश भालेकर यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे.

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!