spot_img
spot_img

अल्पवयीन मुलीचा विनयभंगकरणाऱ्यास अटक तळेगावच्या जंगलात केला घुलेवाडीच्या तरुणाने विनयभंग

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडीमध्ये आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला बस स्थानकावरती सोडण्याचा बहाणा करुन तिला बस स्थानकावर न सोडता थेट तळेगावच्या जंगलात नेऊन तिचा विनयभंग करण्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे.या प्रकरणी शहर पोलिसांनी त्या तरुणास अटक केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्या तील एक १३वर्षीय अल्पवयीन मुलगी घुलेवाडीमध्ये आपल्या नातेवाईकांकडे आली होती.त्या अल्पवयीन मुलीने तिच्या नातेवाईकांच्या शेजारी राहणारा स्वामी रमेश तामचीकर याला संगमनेर बसस्थान का वरती मला सोडता का?अशी विचारना केली असता त्याने तिला होकार दिला.त्या नंतर त्याने तिला त्याच्या मोटरसायकल वर बसवून घुलेवाडीतून संगमनेर बस स्थानकावरती न सोडता थेट तळेगाव परिसरातील जंगलात नेले .आणि त्याने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.मात्र तिने त्यास असे वर्तन करण्यास मज्जाव केलाअसता त्याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.आणि तिला पुन्हा घुलेवाडीतआणून सोडले सायंकाळी तिने तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार भ्रमणध्वनीवरून सांगितला.

निफाड येथून आलेल्या आई सोबत त्या अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाणे गाठले.अन झालेला प्रकार पो नि भगवान मथुरे यांना सांगितला त्यानंतर त्या अल्प वयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वामी रमेश तामचीकर (वय २२, रा. घुले वाडी) याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे (पोक्सो) कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यासपोलिसांनी अटक केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!