संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-संगमनेर तालुक्यातील तिगांव येथील प्रथितयश युवा उद्योजक तसेच भाजपचे उदगीर जिल्हा लातूरचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते गोविंद केंद्रे यांचे जावई प्रकाश सानप यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली
संगमनेर येथील भाजपा कार्यालयात भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, भाजपा अभियंता आघाडीचे प्रदेश उपा ध्यक्ष हरिशचंद्र चकोर,ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी,भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत, भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष कांचन ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश सानप यांना नियुक्तीपत्र देण्यात आले
मराठा आरक्षण, ओबीसी जनगणना तसेच ओबीसी आरक्षण हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकांमध्ये केंद्रबिंदू ठरणार असून जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे तसेच आगामी लोकसभा विधानसभा, जिल्हा परिषद व ,पंचायत समिती तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसी मोर्चा च्या माध्यमातून तन-मन-धनाने काम करण्याचा आपला माणूस असल्याचे नूतन उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सानप यांनी यावेळी व्यक्त केला
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के लक्ष्मण, महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री तथा पालकमंत्री .राधाकृष्ण विखे पाटील ,भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशा ध्यक्ष संजय गाते ,भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक् विठ्ठल लंघे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रकाश चित्ते जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर आदिनी त्यांचे अभिनंदन केले आहे