संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर महाविद्यालयात प्रवेश करताच अनेकांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असणारे जुने कॉलेज कट्टे आठवले. मात्र ते कॉलेज कट्टे महाविद्यालयाच्या विस्तारणीकरणानंतर गायब झाल्याची दिसले .मात्र मोजकेच काही मित्र मैत्रिणी भेटल्याने सर्वांचाच आनंद गगनात मावे नासा झाला होता. तब्बल पंधरा ते वीस वर्षानंतर एकत्र आलेल्या या महाविद्याल यातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महा विद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणीं ना उजाळा देत आपल्या जुन्या आठवणी मध्ये रममाण झाले होते .निमित्त होते संगमनेर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामेळाव्या साठी प्रत्येकाला महाविद्यालयाच्या वतीने लिंक पाठवली होती अनेकांनी ती लिंक भरून पाठवली यावरून महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशी आशा प्राचार्य डॉ अरुण गाय कवाड उपप्राचार्य डॉ रवींद्र तासिलदार माजीविद्यार्थी मेळावा समन्वयक डॉराजेंद्र वामन आणि माजी विद्यार्थी संघाचेसचिव डॉ रवींद्र गायकवाड यांच्यासह सर्व महा विद्यालयातील प्राध्यापकांना अशा लागून होती. या माजी विद्यार्थी मेळाव्यास माजी विद्यार्थी उपस्थित राहू शकले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आहे त्या माजी विद्यार्थ्यांमध्येच हा मेळावा पार पडला.
तब्बल १५ते २० वर्षानंतर महाविद्याल यात झालेल्या अमुलाग्र बदलामुळे अनेक माजी विद्यार्थ्यांना आपण आपल्याच महा विद्यालयात आलो की दुसऱ्या महाविद्या लयात आलो असे चुकल्यासारखे वाटत होते.महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाच्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असणाऱ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या होत्या. तर काहींना खूप वर्षानंतर आपले मित्र मैत्रिणी भेटले .त्या मुळे त्यांच्या एकमेकांच्या जुन्या आठवणी जागृत करत सर्वजण महाविद्यालयात शिकत असताना आपण वर्ग बुडवून कसे कट्ट्यावर बसून गप्पा मारत होतो जुन्या आठवणीत रममाण होऊन गेले होते.
यावेळी.माजी विद्यार्थी प्रतिनिधी आणि राजुर महाविद्यालयाचे प्रा अरुण सातपुते जगदीश पवार, पत्रकार गोरक्ष नेहे, अँड समीर लामखडे, सौ अनिता शेलार यांनी ही आपल्या महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी उपस्थित असलेल्या सर्व माजीविद्यार्थ्यांचे प्रस्ताविक माजी विद्यार्थी मेळावा समन्व यक डॉ राजेंद्र वामन यांनी केले .सूत्रसंचा लन डॉ सुजाता शिरोडे यांनी केले. तर आभार माजी विद्यार्थी संघाचे सचिव डॉ रवींद्र गायकवाड यांनी मानले .