संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा) :- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील प्रा. राहुल सुभाष गायकवाड यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठात संगणक क्षेत्रातील पीएचडी मिळाली आहे.
डाॅ. गायकवाड यांनी “इमेज सेंटीमेंट क्लासीफिकेशन युजिंग डीप लर्निंग” या विषयावर प्रबंध सादर केला. डॉ. राहुल गायकवाड यांनी सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी पोस्ट होणाऱ्या इमेजेस चे कॅप्शन तयार करून इमेजमधून कुठल्या भावना व्यक्त होत आहेत हे डीप लर्निंगच्या माध्यमातून शोधण्यासाठी सुलभ प्रणालीची रचना आपल्या संशोधनात केली.
हे संशोधन त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठ, इंदोर येथून केले आहे. या संशोधनात त्यांना डॉ. प्रज्ञा, डॉ. राजीव विश्वकर्मा, डॉ. संतोष पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. गायकवाड यांनी ४ स्कोपस जर्नलला आणि विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
संगणक क्षेत्रातील पीएचडी मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे मा. महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, विश्वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही.पी. वाघे, संगणक विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास सोनकर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.