नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय नेप्ती आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया (आय. ई . आय.) अहमदनगर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘वर्ल्ड इंजीनियरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर दि. ४ फेब्रुवारी रोजी व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानास प्रमुख पाहुणे म्हणून एल अँड टी इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या कंपनीचे प्लांट हेड श्री दिलीप आढाव हे उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ, त्याचा अभियांत्रिकी क्षेत्रात कसा उपयोग करून घेता येईल, जागतिक स्तरावर असणारे त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहितीचे सादरीकरण पीपीटी च्या माध्यमातून केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे सर यांनी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रात कसा केला जावू शकतो, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयांमधील मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमास आय. ई . आय. चे चेअरमन श्री एम एम आनेकर आणि ऑनररी सेक्रेटरी श्री अभय राजे यांनी विद्यार्थ्यांना आय. ई . आय. विषयी तसेच आपण हा जागतिक इंजिनिअरिंग डे का साजरा करतो याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास एल अँड टी कंपनी चे श्री गिरीश मकोडे, आय ई आय चे श्री बी.डी. खैरे, प्रा. पी. जी. निकम, डॉ. एम. के. भोसले, प्रा. एस. एम. वाळके, प्रा. व्ही. व्ही. जगताप, प्रा. ए. बी. काळे, प्रा. एस. आर. पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. अक्षय देखणे यांनी केले.
कार्यक्रम झाल्यानंतर प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सायन्स डे चा विषय घेवून पोस्टर आणि मोडेल मेकींग कॉम्पेटिशन साठी जे प्रदर्शन महाविद्यालयामध्ये आयोजित केले होते तेथे भेट दिली आणि पोस्टर मधून झळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पनाच कौतुक देखील केले.