महांकाळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा): – श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथे शिर्डी मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या निधीतुन 35 लाख रुपयेच्या विकास कामाचा शुभारंभ खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थित व त्यांच्याच शुभहस्ते नुकताच करण्यात आला.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत हनुमान मंदिर ते दत्ताञय पवार वस्ती रोड खडीकरण व मजबूतिकरण 25 लाख व स्मशानभुमी सुशोभीकरण 10 लाख कामाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रमुख उपस्थित खा, लोखंडे साहेब,शिवसनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,प्रशांत लोखंडे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ,शहर प्रमुख उमेश पवार,जिल्हा संघटक दादासाहेब कोकने,स्विय शिवाजी दिशागत तालुका प्रमुख प्रदीप वाघ,संतोष डाहळे युवासेना तालुका प्रमुख संदिप दातीर,संजय शिंदे उपस्थित होते. तसेच ग्रामस्थान मध्ये निलेश चोरमल सरपंच, नारायण बडाख,लक्ष्मण दातीर, राहुल दातीर, दत्ताञय पवार,किशोर जाधव, राहुल पवार, शिवाजी घोगरे,विठ्ठल सोमवंशी, कचरू महांकाळे जमादार शेख, पंढरीनाथ बडाख,गोकुळ खुरुद बाळासाहेब बडख,हरिभाऊ खुरुद,पोपट पवार, शिवाजी बडाख, संदिप पवार किशोर बडाख उपस्थित होते. या वेळी युवासेना तालुका प्रमुख संदिप दातीर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.