19.3 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

पिंपळगाव कोंझीरा येथे ४०० महिलांच्या उपस्थितीत हळदीकुंकू संपन्न समाजाच्या प्रगतीत महिलांचे मोठे योगदान- डॉ जयश्रीताई थोरात

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):–शिक्षणामुळे महिलांनी मोठी प्रगती साधली आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वीपणे कार्यरत असून कुटुंबाच्या आणि देशाच्या व समाजाच्या प्रगतीत महिलांचे मोठे स्थान असून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे अशी आग्रही प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

पिंपळगाव कोंझिरा येथे महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियान व संत रघुनाथ बाबा महिला ग्राम संघाच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ,गटविकास अधिकारी अनिल नागणे, सुरभी मोरे ,बादशाह वाळुंज, रवींद्र खलाटे ,निलेश कोकाटे, सुनंदा कोकाटे, सरपंच सोनाली ताई करपे, उपसरपंच संगम आहेर,संतोष करपे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुमारे चारशे महिला उपस्थित होत्या.

यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की हळदीकुंकवाच्या निमित्ताने महिला एकत्र येतात. एकमेकी बरोबर सुखदुःख बोलतात. ही परंपरा जरी असली तरी त्यातून विचारांची देवाणघेवाण होते. यामध्ये एकल महिलांनी सहभागी करून घेतले पाहिजे. दुर्दैवाने त्यांच्यावर त्यांच्यावर एकलपनाची वेळ आली असून त्यांचाही प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा राज्यांमध्ये अग्रगण्य आहे. विचारांची आणि विकासाची दिशा असलेल्या या तालुक्याने सर्व क्षेत्रांमध्ये आपली प्रगती साधली आहे आपण संगमनेर करा आहोत याचा अभिमान सर्वांनी सदैव बाळगला पाहिजे. राजकारण हे तळागाळातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी असते ही परंपरा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिली असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली याच तत्त्वावर काम सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

तर आर एम कातोरे म्हणाले की, स्वर्गीय अशोकराव मोरे यांची परंपरा असलेल्या पिंपळगाव ने कायम आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. आमदार थोरात यांच्या माध्यमातून या गावासह पश्चिम भागात अनेक विकास कामे राबवली जात असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अनिल नागरे यांनी केले यावेळी परिसरातील महिला नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!