20.6 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

यशवंत पाणी वापर संस्थेत सत्ताधारीला ८ तर विरोधी मंडळाला ४ जागा 

सोनई ( जनता आवाज वृत्तसेवा ):- सोनई जवळील वंजारवाडी येथील यशवंत पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी यशवंत शेतकरी मंडळाने सरपंच महादेव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता मिळवली आहे १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत यशवंत मंडळाला ८ तर विरोधी व वीरभद्र शेतकरी मंडळाला ४ जागा मिळाल्या.

रविवार दि ३ मार्च रोजी मतदान पार पडले मतमोजणी पूर्ण होवून निकाल घोषित करण्यात आला. विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे यशवंत शेतकरी सहकारी मंडळाकडून किरण सुदाम दराडे, गणेश महादेव दराडे, सीमा अशोक दराडे, गोरक्षनाथ विठ्ठल वने, दिनकर कुंडलिक बानकर, सखाराम रंगनाथ शिंदे, अलका बाळासाहेब जामदार, सुलोचना सुदाम बानकर तर विरोधी वीरभद्र शेतकरी विकास मंडळाकडून सुनील लक्ष्मण पालवे, जयसिंग मिठ्ठू दराडे, प्रभाकर जगन्नाथ बानकर, तय्यब साहेबलाल इनामदार हे विजयी झाले. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास पाटील तर, सहाय्यक म्हणून बी. व्हि घोरपडे यांनी काम पाहिले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!