टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान गावठाण हद्दीतील सरकारी जागा हडप झाल्याने आता गाळा माफियांनी थेट संस्थेच्या, शाळेच्या व शासकिय कार्यालयांच्या जागेकडे मोर्चा वळवून गाळे बांधायला सुरूवात केल्याने व त्यात ग्रामपालक असलेले ग्रामपंचायत सदस्यच पुढे असल्याने अतिक्रमणाच्या या हैदोसावरुन ग्रामपंचायत सदस्यांमध्येच मोठा राडा झाला. त्यात एक ग्रामपंचायत सदस्य जखमी झाल्याने टाकळीभान येथे मोठी खळबळ उडाली आहे.
टाकळीभान येथील सरकारी जागेवर गेली अनेक वर्षांपासून आतिक्रमण होत असल्याने सर्व जागा हडप करण्यात आली आहे. त्यातच गाळा माफियांनी प्रथम पासूनच चतुराई करुन मोकळ्या जागेत गाळे बांधून त्याची विक्री करुन मोठी आर्थिक कमाई केल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र आता जागाच शिल्लक राहील्या नसल्याने या गाळा माफियांनी वक्रदृष्टी संस्था, शाळा व शासकिय कार्यालयांच्या मोकळ्या जागेवर पडल्याने त्या जागा बळकावून गाळे बांधण्या पर्यंत मजल गेली आहे.
येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालया जवळ कृषी मंडळ कार्यालयासाठी सुमारे तीस वर्षांपुर्वी शासकिय गट नंबर २५० मधील जागा ग्रामपंचायतीचे ठरावाने देण्यात आलेली आहे. या जागेवर कषी विभागाने सुमारे ८ लाख रुपये खर्च करुन पक्की इमारत बांधून बाजूने तारेचे कुंपण केलेले आहे. काळच्या ओघात बाजूचे तारेचे कुंपण गायब झाले असले तरी कृषी मंडळ अधिकारी कार्यालय दिमाखात उभे आहे. आणि याच मोकळ्या जागेवर गाळा माफियांची नजर गेल्याने काल मंगळवारदिनांक ५ मार्च रोजी माफियांनी सकाळीच राजरोसपणे खडी, वाळू, सिमेंट, लोखडी खांब आणून मशिनच्या सहाय्याने मोकळी जागा साफ करुन थेट गाळे बांधायला सुरवात केली. या गाळा माफियात तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यही सहभागी झालेल आहेत. याबाबतची माहीती उपसरपंच कान्हा खंडागळे यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने या ठिकाणाकडे धाव घेत बांधकामाला मज्जाव केला. कृषी खात्याची जागा आसल्याने या जागेवर आनाधिकृत गाळे होवू देणार नाही आसा आग्रह खंडागळे यांनी धरला. मात्र ग्रामपंचायत सदस्य सुनिल बोडखे व उपसरपंच खंडागळे यांच्याच बाचाबाची होवून बाचाबाचीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. यावेळी सदस्य सुनिल बोडखे यांना जास्त मार लागल्याने त्यांची शुगर लेवल वाढल्याने त्यांना थेट उपचारा साठी श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमी झालेला दुसरा तरुण लाला मैड यांने तालुका पोलिस ठाण्याकडे धाव घेतली असल्याने मारहाणी बाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.
याबाबत कृषी विभागाचे कृषी सहाय्यक धुमाळ घटनास्थळी उपस्थित असल्याने त्यांनी कृषी विभागाच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याने वरीष्ठांशी सल्ला मसलत करुन अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. या अतिक्रमणा बाबत स्थानिक गावपुढार्यांशी संपर्क साधला आसता त्यांनी कानावर हात ठेवले. काहीही आसले तरी सध्या गाळा माफियांची दबंगगिरी वाढत असल्याने नागरीकांचे सार्वजनिक स्वास्थ्य बिघडत असून रक्षकच भक्षक होत असतील तर सामान्य नागरीकांनी न्याय कोणाकडे मागायच असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.