23.6 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा) :- कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची महायुती शासनाने दखल घेवून आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव मतदार संघातील आठ गावातील ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांना या संधीचा उपयोग करून घेत मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने धडपड करून मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळविण्याचा आ. आशुतोष काळे यांचा सपाटा सुरूच आहे. त्यामुळे मागील साडे चार वर्षात २९०० कोटीच्या निधीला गवसणी घालण्यात त्यांना यश आले असून या निधीतून मतदार संघाचा सर्वागीण विकास साधण्यात ते यशस्वी झाले आहेत. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध विभागाच्या माध्यमातुन त्यांनी हा निधी मिळवून विकासाची दिलेली आश्वासने ते पुर्ण करीत असून प्रत्येक गावातील नागरिकांच्या विकासाच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.

विकासकामांना निधी मिळविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना नियमितपणे यश मिळत असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मधून ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मतदार संघातील राहाता तालुक्यातील चितळी येथील श्री. मारूती मंदिर ते (स्टेशन वरील) ग्रा.पं.मालमत्ता क्र. ८६२ या जागेत सुशोभिकरण करणे (१० लक्ष), धनगरवाडी येथील श्री. हनुमान मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालमत्ता क्र.१ जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे(०९.९९ लक्ष), रामपूरवाडी येथील श्री. स्वामी समर्थ मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालमत्ता क्र. ८५२ जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे (०४ लक्ष),कोपरगाव तालुक्यातील जेउर पाटोदा येथील ग्रा. पं. गट क्र. उपविभाग ७०/९ जागेत सभागृह बांधणे (१० लक्ष), भोजडे येथील ग्रा. पं. मालमत्ता क्र. ३१९ जागेत सभागृह बांधणे (०९.९९ लक्ष), मळेगांव थडी येथील चारी नं. ५ तुकाराम रक्ताटे वस्ती ते योगेश खोंडेवस्ती रस्ता करणे (१९.९९ लक्ष), रांजणगांव देशमुख येथील चांनखनबाबा मंदिर ते अशोक खालकर पर रस्ता करणे (०९.९९ लक्ष), लौकी गांव ते कोळनदी (तळेगाव रोड) रस्ता करणे (०९.९९ लक्ष) या विकास कामांना या निधीतून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार,महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.तसेच चितळी, धनगरवाडी, रामपूरवाडी,जेऊर पाटोदा, भोजडे,मळेगाव थडी, रांजणगाव देशमुख या गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.त्री तथा

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!