11.8 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

जागाही निश्चित, वॉल कंपाऊंडही करण्यात आले मग…… कोल्हार उपकेंद्राचे घोडे अडले कुठे ?

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ):- राहाता तालुक्यातील तिसगाव व तांबेवाडी फिडर वरील शेतकरी यांनी दिनांक ७ रोजी कोल्हार महावितरण कक्षातील कनिष्ठ अभियंता श्री गाढे साहेब यांना दोन्ही फिडरवर पूर्ण दाबाने वीजप्रवाह सुरळीत करावा त्याचबरोबर वीज प्रवाह हा पूर्ण दाबाने सुरळीत करावे. अन्यथा आठ दिवसानंतर कोल्हार येथे नगर -मनमाड महामार्गावर रस्ता रोको करण्यात येईल असे आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तिसगाव व तांबेवाडी फिडरवरती गेल्या अनेक दिवसापासून दिवस व रात्री वेळेस वीजप्रवाह हा पूर्ण दाबाने मिळत नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकरी अनेक दिवसापासून त्रस्त होते. महावितरण अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही उडवा उडवीची उत्तरे दिली जात होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याने मध्ये महावितरण बद्दल नाराजगीचे सूर उमटत होते.

गेल्या अनेक दिवसापासून वीज दुरुस्तीच्या नावाखाली ४ ते ५ तास वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असे त्यानंतर उपलब्ध होणारी वीज कमी दाबाने उपलब्ध होत असल्यामुळे पाण्याच्या मोटरी या परिपूर्ण चालत नसे त्यामुळे शेतीचा केलेला खर्च हा वायाला जात आहे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत त्यातच महावितरण आपण विजेचा बट्ट्याबोळ असे अनेक प्रश्न शेतकऱ्याला भेडसावत होते.

महावितरण आपण कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही अनेकदा महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही असे अनेक उदाहरण परिसरात घडले असल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला. यामुळे आज महावितरण कोल्हार कक्षातील कनिष्ठ अभियंता गाढे साहेब यांना शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत त्याचबरोबर वीज पुरवठा सुरळीत कधी करणार असे अनेक प्रश्न कधी तुम्ही मार्गी लावणार अशी त्यांना विचारणा केली आहे. अभियंता गाडे साहेब यांनीही आपल्या सर्व भावना लवकरात लवकर वरिष्ठांपर्यंत पोहोचवून या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

या निवेदनावर १०० पेक्षा जास्त शेतकरी स्वाक्षरीचे निवेदन कनिष्ठ अभियंता गाढे साहेब यांना देण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने प्राथमिक स्वरूपात पाच जणांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.श्री पांडुरंग देवकर, श्री रमेश निबे, श्री.राजेंद्र खर्डे, श्री.विठ्ठल देवकर , श्री.नंदूशेठ तरकसे, श्री.अजित मोरे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 महाविकास आघाडी सरकारच्या काळात या उपकेंद्रच्या करीता निधी व मंजुरी मिळाली असे त्यावेळची ऊर्जा राज्यमंत्री व महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मग नवीन उपकेंद्राचे घोडे कुठे अडले असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांना पडला आहे. या उपकेंद्राची जागा निश्चित झाली असून व वॉल कंपाऊंड ही करण्यात आले आहे. अशा सर्व बाबी पूर्ण असतानाही यात कुणी जाणीवपूर्ण राजकारण तर करत नाही ना? असा सवाल समस्त शेतकरी वर्गाला पडला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!