spot_img
spot_img

जळगांव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची संजीवनी उद्योग समुहास भेट 

कोपरगांव दि ७( जनता आवाज वृत्तसेवा ):-जळगांव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र स्टेट जळगांव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनचे विभागीय संचालक संजय मुरलीधर पवार यांनी नुकतीच संजीवनी उद्योग समुहास भेट देवुन पाहणी केली त्याबददल तसेच त्यांची महाराष्ट्र स्टेट मार्केटींग फेडरेशन (मुंबई) च्या संचालकपदी नाशिक विभागातुन नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याअंतर्गत विविध प्रकल्पांची बिपीनदादा कोल्हे यांनी माहिती देवुन कारखान्याने देशात सर्वप्रथम ज्युस पासून इथेनॉल तयार करण्यांत नांवलौकीक मिळविला असल्याचे सांगितले. सत्कारास उत्तर देतांना श्री. संजय पवार म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी खुल्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणारी आव्हाने, शेतक-यांचे प्रति हेक्टरी उसासह अन्य पीक उत्पादन वाढ कार्यकम, आसवनी व त्यावर आधारीत उपपदार्थ निर्मीती, बायोगॅस, सहवीज, हायड्रोजन ऊर्जा निर्मीती इत्यादीबाबत देशातील साखर उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देत जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले असुन त्यांची तिसरी पिढी अत्यंत कुशाग्र व हुशार असुन सहकारासमोर निर्माण होणारी आव्हाने सोडविण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. संजीवनी ही ग्रामिण अर्थकारणाची कामधेनू आहे असेही ते म्हणाले. कारखाना अंतर्गत नव्याने अद्यावत बनवलेल्या प्रशासकीय इमारतीचे सरू असलेले काम पाहून संजय पवार यांनी गौरवोदगार काढले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!